AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर, राजकीय नेत्यांचे डिस्नी स्टाईल कार्टुन; पाहा अमित वानखेडेंची कलाकृती
AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे डिस्नी स्टाईल कार्टुन स्टाईलमध्ये (Disney cartoons) साकारले आहेत.
Artificial Intelligence : सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी Advance झाल्याचे आपण पाहतो. याचा फायदाही होताना दिसत आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील दिवंगत नेते डिस्नी स्टाईलमध्ये कार्टुन (Disney cartoons) साकारले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे डिस्ने कार्टुन तयार केले आहेत.
आर्टिफिशियल डिझाईनिंगची कमाल आता सगळीकडेच अनुभवायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून वेगवेगळी कामं सोयीस्कर केली जात आहेत. AI चा वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. अशाच पद्धतीनं AI च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असलेल्या अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील दिवंगत नेत्यांचे डिस्ने कार्टुन साकारले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे. हे कार्टून सोशल मीडियावर मोठ्या प्रणाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अमित वानखेडे यांनी ज्या नेत्यांचे डिस्ने कार्टुन साकारले आहे, त्या नेत्यांनी वानखेडे यांचे आभारही मानले आहेत. तसेच त्यांनी AI च्या माध्यमातून साकारलेल्या कार्टूनचे कौतुक देखील केलं आहे.
कोणकोणत्या दिवंगत नेत्यांचे साकारले डिस्ने कार्टुन
अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील काही दिवंगत नेत्यांचे स्टाईलमध्ये कार्टुन साकारले आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर आर पाटीलस राजीव सातव, गिरीष बापट, विनायक मेटे या दिवंगत नेत्यांचे डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रमुख नेत्यांचे साकारले डिस्ने स्टाईल कार्टुन
अमित वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे डिस्ने स्टाईल कार्टुन साकारले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या प्रमुख नेत्यांचे डिस्ने कार्टुन साकारले आहे. विशेष म्हणजे यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित वानखेडे यांचे आभार देखील मानले आहेत.
जयंत पाटलांसह वळसे पाटलांनी अमित वानखेडेंचे मानले आभार
अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल. कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे असे जयंत पाटील यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे. आर्टिस्ट अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने अर्कचित्र साकारल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! आपल्या कलेला अधिक प्रोत्साहन मिळून उत्तमोत्तम कलाकृती आपल्या हातून घडोत ही सदिच्छा, असे दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अमित वानखेडे
दरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अमित वानखेडे यांनी साकरालेल्या डिस्ने कार्टुनबद्दल एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मीड जर्नी नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे डिस्ने कार्टुन स्टाईल साकारले आहे. यामध्ये तुम्हाला नेमका फोटो कसा हवा याबाबतची माहिती त्या सॉफ्टवेअरला देणं गरजेचे असते. हे इनपूट शब्दाच देणं गरजेचं असते. त्यानंतर आपल्याला हवे तसे फोटो मिळतात असे नावखेडे म्हणाले. मला राजकीय क्षेत्राची आवड असल्यामुळं प्रथम मी राजकीय नेत्यांचे डिस्ने कार्टुन साकराले आहेत. पार्ट वनमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे कार्टून साकारले आहे. तसेच महाराष्ट्रातील दिवंगत नेत्यांचेही डिस्ने कार्टून साकारल्याचे वानखेडे यांनी सांगितले. मी डिस्ने कार्टुन छंद म्हणून केले आहे. मी राजकीय नेत्यांची कार्टून सिरीज पूर्ण करणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, तसेच अपक्ष नेत्यांचे कार्टून साकारणार असल्याचे वानखेडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: