एक्स्प्लोर

देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात, व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम

India's first AI University : देशातील पहिलं AI विद्यापीठ युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) महाराष्ट्रात मुंबईजवळ कर्जत येथे स्थापन करण्यात आलं आहे.

First AI University In India : देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईजवळील कर्जत येथे AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचं विद्यापीठ सुरु होत आहे. AI  संबंधित हे देशातील पहिलं विद्यापीठ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असं म्हटलं जातं. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या AI विद्यापिठाची स्थापना करण्यात आली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) या विद्यापिठामध्ये 1 ऑगस्टपासून पहिलं शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.

देशातील पहिलं AI विद्यापिठ

देशातील पहिलं AI विद्यापीठ युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) महाराष्ट्रात मुंबईजवळ कर्जत येथे स्थापन करण्यात आलं आहे. या ग्रीन कॅम्पस असेल आणि त्याला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. भारतातील अशा प्रकारचं हे पहिलं विद्यापीठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईजवळ सुरु होत आहे. या विद्यापिठात AI चा अभ्यास केला जाईल. हे विद्यापीठ AI तंत्रज्ञानाच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावेल. 

मुंबईजवळी कर्जत येथील युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी

मुंबईजवळील कर्जत येथे 1 ऑगस्टपासून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (Specialised Courses) सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिलं जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण दिलं जाणार आहे. या मुंबई विद्यापिठात AI तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.

व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम

AI विद्यापीठामध्ये AI तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व आणि पदवीधर अभ्यासक्रम आहेत. तसेच जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी, कायदा, पर्यावरण आणि क्रीडा विज्ञान यासारखे इतर नवे-जुने संमिश्र अभ्यासक्रम तयार केले आहेत. जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी AI शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचं आहे.

AI युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्यं

AI विद्यापीठाचं कॅम्पस मुंबईत स्थापन करण्यात आलं आहे. येथे विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवले जाईल. AI विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा चा वापर केला जाईल. तरुणांना ऑगमेंटेड रिॲलिटी, मिक्स्ड रिॲलिटी, आयओटी, ब्लॉकचेन यांवर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Wadeshwar Katta : धंगेकर, वसंत मोरे, वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र, निवडणुकीतले भन्नाट किस्से
Pune Wadeshwar Katta : धंगेकर, वसंत मोरे, वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र, निवडणुकीतले भन्नाट किस्से
Bollywood Actor In Pakistani Movies :  पाकिस्तानी चित्रपटात झळकले आहेत 'हे' बॉलिवूडचे सेलेब्स ;  पाहा यादी
पाकिस्तानी चित्रपटात झळकले आहेत 'हे' बॉलिवूडचे सेलेब्स ; पाहा यादी
Bollywood Actress : एका छोट्या खोलीत अभिनेत्रीने घालवलं बालपण; आज आहे 550 कोटींची मालकीण! ओळखलं का?
एका छोट्या खोलीत अभिनेत्रीने घालवलं बालपण; आज आहे 550 कोटींची मालकीण! ओळखलं का?
Madhavi Raje Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना मातृशोक; माधवीराजे यांचे निधन
केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना मातृशोक; माधवीराजे यांचे निधन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhandara : शेतकऱ्यांना मिळाली विम्याची कवडीमोल रक्कम;सरकारकडे उपहासात्मक मागणीHemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा ExclusiveBalaji Sutar : देशात जेव्हा अराजकता निर्माण झाली तेव्हा साहित्यिकांची भूमिका महत्वाची ठरलीTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 02 PM : 15 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Wadeshwar Katta : धंगेकर, वसंत मोरे, वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र, निवडणुकीतले भन्नाट किस्से
Pune Wadeshwar Katta : धंगेकर, वसंत मोरे, वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र, निवडणुकीतले भन्नाट किस्से
Bollywood Actor In Pakistani Movies :  पाकिस्तानी चित्रपटात झळकले आहेत 'हे' बॉलिवूडचे सेलेब्स ;  पाहा यादी
पाकिस्तानी चित्रपटात झळकले आहेत 'हे' बॉलिवूडचे सेलेब्स ; पाहा यादी
Bollywood Actress : एका छोट्या खोलीत अभिनेत्रीने घालवलं बालपण; आज आहे 550 कोटींची मालकीण! ओळखलं का?
एका छोट्या खोलीत अभिनेत्रीने घालवलं बालपण; आज आहे 550 कोटींची मालकीण! ओळखलं का?
Madhavi Raje Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना मातृशोक; माधवीराजे यांचे निधन
केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना मातृशोक; माधवीराजे यांचे निधन
'जरांगे साहेबांनी उपोषण करू नये, आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या', मराठा बांधवांची भूमिका
'जरांगे साहेबांनी उपोषण करू नये, आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या', मराठा बांधवांची भूमिका
पंतप्रधानांच्या कल्याण दौऱ्याअगोदर मानापमान नाट्य, व्यासपीठावर जागा न दिल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा डायरेक्ट राजीनामा
पंतप्रधानांच्या कल्याण दौऱ्याअगोदर मानापमान नाट्य, व्यासपीठावर जागा न दिल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा डायरेक्ट राजीनामा
PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबईत आज नरेंद्र मोदींचा रोड शो...फुगे, पतंगवर बंदी; 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू, मुंबई पोलिसांचा निर्णय
मुंबईत आज नरेंद्र मोदींचा रोड शो...फुगे, पतंगवर बंदी; 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू
Lok Sabha Election 2024 : कंगना रनौत, हेमा मालिनी अन् पवन सिंहकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त कॅश; उमेदवारी अर्जात खुलासा
कंगना रनौत, हेमा मालिनी अन् पवन सिंहकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त कॅश; उमेदवारी अर्जात खुलासा
Embed widget