एक्स्प्लोर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाला सुरुवात

2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी अण्णांनी हे मौन धारण केले आहे. सरकार कडून कडक कायदे होत नाहीत आणि न्यायालयातील रिक्त पद भरली जात नाहीत त्यामुळे आरोपींना शिक्षा मिळण्यास उशीर होत असल्याचे अण्णांनी म्हणले आहे.

मुंबई : देशभर महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात संत यादवबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अण्णांनी मौनव्रत धारण केलं. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अण्णांनी मौन धारण केलं आहे. आरोपींना फाशी दिली नाही तर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देखील अण्णांनी दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या गावात असलेल्या राळेगणसिद्धी येथे साडेअकरा वाजता मौन आंदोलन सुरू केले आहेत. 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी अण्णांनी हे मौन धारण केले आहे. सरकार कडून कडक कायदे होत नाहीत आणि न्यायालयातील रिक्त पद भरली जात नाहीत त्यामुळे आरोपींना शिक्षा मिळण्यास उशीर होत असल्याचे अण्णांनी म्हणले आहे. इतकेच नाही तर सरकारची महिलांच्या बाबतची संवेदनशीलता कमी झाल्याचा आरोप देखील अण्णांनी केलाय. आता तरी सरकारला जाग यावी आणि निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी अण्णांनी आजपासून मौन आंदोलन सुरू केले आहे. जर प्रशासनाने आरोपींना फाशी दिली नाही तर पुन्हा एकदा प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे इशारा देखील अण्णांनी दिला आहे. अण्णा हजारे म्हणाले, न्याय मिळेत नसेल तर आंदोलन करणे गरजेचे आहे. आंदोलन करताना हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अहिंसाच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे. मी गेले 35 वर्षापासून आंदोलन केले आहे. 2011 च्या आंदोलनात एकही दगड फेकला गेला नाही, अशाप्रकारे आंदोलन झालं पाहिजे. दिल्लीमध्ये निर्भयाच्या घटनेमध्ये २०१३ मध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर आतापर्यंत या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही आजपर्यंत आरोपींना फाशी झालेली नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात महिला अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा मिळेपर्यंतची प्रक्रिया या जलद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीत आपण मौन व्रत आंदोलन सुरू करीत आहोत, असे अण्णा हजारे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget