एक्स्प्लोर

Anil Deshmukh : वसुलीप्रकरणी अनिल देशमुख चौकशीसाठी चांदीवाल आयोगासमोर हजर

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली.

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास चांदीवाल आयोग करत आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी अनिल देशमुख यांना आयोगानं समन्स बजावला होता. अनिल देशमुख सकाळी साडेअकराच्या सुमारास आयोगासमोर हजर राहिले. सोमवारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी हे दोघं समोरासमोर आले आणि या दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अनिल देशमुखांच्या वकिलांनीही या भेटीवर आक्षेप नोंदवलाय.

वसूलीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांना न्यायालयीन चौकशी सुनावली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर राज्य सरकारने या चौकशीसाठी निवृत्त   चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. यामार्फत अनिल देशमुख, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची चौकशी सुरु आहे.  

काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. तर 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर परमबीर सिंह आणि अनिल देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीची चौकशी, मुंबई पोलिसांना आदेश : गृहमंत्री
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "कालची भेट अत्यंत चुकीचं आहे. कोर्टच्या आदेशानंतर अशी भेट घेता येते. मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची नक्कीच चौकशी करण्यात येईल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत. ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. हे  चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget