एक्स्प्लोर

Unseasonal Rain : पालघर, नाशिक, बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना फटका

Palghar, Nashik Buldhana Unseasonal Rain : पालघर, नाशिक तसंच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Palghar, Nashik Buldhana Unseasonal Rain : हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली असताना, पालघर (Palghar), नाशिक (Nashik) तसंच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. तर नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस

पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला. यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदारस वीट भट्टी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस, पिकांना फटका बसण्याची शक्यता

दुसरीकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर अवकाळी पावसाच्या रुपाने नवं संकट उभं राहिलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचं देखील समोर आलं आहे.

बुलढाण्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतातूर 

बुलढाणा जिल्ह्यात रात्री जवळपास सर्वच तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाच्या सरी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये रात्री पावसाच्या सरी बरसल्या. शहरातील काही भागात देखील रात्री तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7  मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. 

फळबागा, पिकांना फटका

राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहेत. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. त्यातच  अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय पिकांवर रोग पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसंच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तूर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. 

हेही पाहा

Rain : नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळेABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget