हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.
2/8
अवकाळी पावसाचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
3/8
अवकाळी पावसामुळं पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
4/8
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.
5/8
गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
6/8
पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं आंबा पिकासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
7/8
पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या.
8/8
शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांची तारंबळ उडाली