(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरआहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली.
नाशिक : एसटी महामंडळातील भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा एसटी एखाद्या चांगल्या कंपनीकडे चालवायला का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरआहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली. सर्वात पहिले एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी एसटी संपावरून आज राज्य सरकारवर टीका करत कर्मचाऱ्यांची बाजू घेतली.
"तुमच्या हातात लोकांसाठी राज्य दिलं आहे. आरेरावीची भाषा करण्यासाठी नाही." असा टोला लगावत राज ठाकरे म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे. चार-चार महिने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. दिवाळी बिन पगारी गेली आहे. त्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली आहे. त्यामुळे सगळ्या संघटना बाजूला ठेवून एसटी कर्मचारी एकत्र आले आहेत. हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढला पाहिजे. असे मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
जातीपातीतून बाहेर पडा
जातीपातीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. त्यामुळे जातीपातीतून बाहेर पडा. असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दिसतोय तेवढा सरळ नाही. असेही सांगितले.
संबंधित बातम्या
आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज; राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक, महापालिका आयुक्तांना पत्र