एक्स्प्लोर

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक, महापालिका आयुक्तांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्त इक्बाल सिंह यांना पत्र लिहित वाढीव वीज बिल प्रकरणी समिती नेमण्याची मागणी केली आहे.

मुंबई : लॉकडाऊन आणि वाढती महागाई यामुळे सामान्य जनता त्रासली असताना वाढीव वीज बिलानेही (Light Bill) सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान बेस्ट कंपनीकडूनही (BEST Company) ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्राहकांच्या बाजूने येत महापालिका आयुक्तांची भेटही घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आयुक्तांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे.

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक, महापालिका आयुक्तांना पत्र

'बेस्टने परस्पर वाढवले दर'

बेस्ट कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला (Maharashtra Electricity Regulatory Commission) जो खर्च दाखवला आहे, प्रत्यक्षात तो खर्च न करता MERC कडून मंजूरी घेऊन बेस्टने परस्पर वीज दर वाढवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार  बेस्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून देखील यावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे महापालिका आयुक्तांची भेट घ्यावी लागल्याचंही मनसे नेत्यांनी सांगितलं.

'तोडगा काढण्यासाठी समिती नेमावी'

या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने मुन्सिपल ऑडिटर समिती नेमावी. ज्यातून नेमका बेस्टने किती खर्च केला आणि त्यांच बील वाढवणं योग्य आहे का? हे ही स्पष्ट होईल. त्यामुळे त्वरीत ही समिती नेमण्याची मागणी मनसेने केली आहे. दरम्यान या समितीच्या अहवालानंतर ग्राहकांचे वीज दर कमी करावे किंवा अधिक घेतलेले पैसे परत करावे लागतील, असंही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Embed widget