आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज; राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
Raj thackeray Maharashtra Tour : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, मनसे नेते बाळा नांदगावकरांची माहिती
Raj thackeray Maharashtra Tour : आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली.
राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.
पाहा व्हिडीओ : मनसे अध्यक्ष Raj Thackeray 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईत पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करताना जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येनं कार्यकर्ते आणि नेते या बैठकीला उपस्थित राहतील. ही बैठक सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तसेच माध्यमांशीही संवाद साधतील. 16 डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुण्यात जातील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, अशी माहितीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी दुपारी 3 वाजता एबीपी माझा लाईव्ह पाहा