संजय राऊत म्हणजे कोण? शहाजीबापू म्हणाले 5 लिटर रॉकेल आणि 2 काडीपेट्या घेऊन नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केलीय.
Shahajibapu Patil on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत हे पाच लिटर रॉकेल आणि दोन काड्याच्या पेट्या घेऊन सकाळी नारळाच्या झाडा खाली बसलेला माणूस अल्याची शहाजी बापू पाटील म्हणालेत. दरम्यान, आता शहाजीबापू पाटील यांच्या टिकेला संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन तुतारी या चिन्हासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. पक्षाच चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल पण त्या चिन्हाला लोक मतदान करतील का हे पाहणं महत्वाचं आहे. चिन्ह लोकांपार्यंत पोहोचवन अवघड नसल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभेसंदर्बात देखील वक्तव्य केलं. ती जागा भाजपची आहे. त्यामुळं आम्ही त्या जागेची मागणी करणार नाही. तिथं मी शिवसेनेचा एकटाच आमदार आहे. तिथं आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, गणपतराव देशमुख यांचे नातू माढा लोकसभा लढणार अशीही चर्चा सुरु आहे. यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, ती कॉलेजची पोरं कशाला खासदारकी लढवतील. त्यांना आमदारकी लढू द्या असे पाटील म्हणाले.
लोकसभेच्या बाबतीत माझा अभ्यास नाही
लोकसभेच्या बाबतीत मला माहिती नाही. एवढा माझा अभ्यास नाही. मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगेन, पण लोकसभेची तयारी सुरु झाली असल्याची आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले, आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही