संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले, आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केला होता.
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही. तुमच्यासारखे पळपुटे नाही, पळून जाणारे नाही, आम्ही डरपोक नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भाजपच्या अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये.. काय ही लाचारी, बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता, असेही राऊत म्हणाले.
अमित शाह मातोश्रीवर का आले होते ? एकनाथ शिंदेंना माहितेय का ?
अमित शहा मातोश्रीमध्ये कशाला आले होते ? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी स्वत:ला विचारावा. त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का? मी होतो. बंद दाराआड चर्चा झाली तेव्हा मी होतो, एकनाथ शिंदे नव्हते, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलेय. अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केला होता. त्याला संजय राऊतांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न एकना शिंदे यांनी स्वतःला विचारावा, त्यावेळेस ते मातोश्री वर होते का? मी होतो, असे संजय राऊत म्हणाले.
या महाराष्ट्रात मुख्यमंत्री ज्या पदावर बसलेत, त्यांना काहीही बोलण्याचं लायसन्स दिलं नाही. ते बोलत असताना कोल्हापुरातील अधिवेशातून लोकं उठून जात होते. त्याचे व्हिडिओ आले आहेत, असा खोचक टोलाही शिंदेंना लगावला. अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न एकना शिंदे यांनी स्वतःला विचारावा. पण त्यांना तेव्हा काय स्थान होते, हे तेव्हा पक्षाचे नेते देखील नव्हते. सर्वांनी मिळून त्यांना पक्षाचा नेता आम्ही आता केलं होतं, असेही राऊत म्हणाले.
हा माणूस भाजपचा गुलाम आणि नोकर झाला -
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली? हे अमित शहा यांनी सांगावे. अमित शहा बाळासाहेबांच्या खोलीत गेले होते की नाही? हे आम्ही शहाण्यांनी सांगावे. त्यावेळी इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भाजपचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाले आहे..त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करत आहे, असा टोला संजय राऊतांनी शिंदेंना लगावला.
2014 ला युती तुटल्यावर त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची फाटली. आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवर कशा करता आले, याचं उत्तर शिंदेंनी द्यावं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर राहून राहून खोटं बोलण्याचं व्यसन जडले आहे.
संजय राऊतांची जीभ घसरली -
हॉटेल ब्लू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पावर स्टेरिंग फिफ्टी-फिफ्टी आता यांच्या कानात काय गोळे बसलेत का? यांच्या कानाला बूच बसलय आहे. ऐकलं नाही त्यांनी. महाराष्ट्र धडा शिकवणार, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही. तुमच्यासारखे पळपुटे नाही, पळून जाणारे नाही, आम्ही डरपोक नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भाजपच्या अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये.. काय ही लाचारी, बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता, असे राऊत म्हणाले.
हिम्मत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या -
यांच्यात कशात जोर आहे. कमरेत जोर आहे. दिल्लीतमध्ये जाऊन वाकत आहेत. यांना निवडणुकीमध्ये कळेल. हिम्मत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या, मग जोर काय आहे ते काढू. खोक्यातून कचराच गेला आहे. आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे, तुमच्याकडे गेला तो कचराच आहे. आम्ही बरोबर बोलत आहे, असे संजय राऊत म्हणाले.