(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्राची, भाजपचा विरोध मला नसून नरेंद्र मोदींना : उदय सामंत
प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली असेल आणि भाजप त्याला विरोध करत असेल तर तो विरोध मला नसून नरेंद्र मोदी यांना आहे, असे मत उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगतात की वंचित घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम प्रत्येक विद्यापीठात झालं पाहीजे. तेच काम आम्ही करत आहे. प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली असेल आणि भाजप त्याला विरोध करत असेल तर हा विरोध मला नसून नरेंद्र मोदी यांना आहे असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेनंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ' प्र. कुलपती पदाविषयी मी फार डोळसपणे पाहतो. कारण राजकीय अड्डा हा शब्द प्रयोग भाजपने केलाय तो अतीशय महत्वाचा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठांच्या कायद्यात बदल करून मला राजकीय अड्डा बनवायचा आहे. मात्र, स्वत:चे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होतील म्हणून युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून मुख्यमंत्र्यांना पत्रे पाढवण्याचं षडयंत्र सुरू आहे अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.
...तर एसटी विलिनीकरणाला शासन तयार
एसटी विलिनीकरणाच्या मुद्यावर हायकोर्टाने समिती नेमण्याची सूचना केली. त्याप्रमाणे समिती नेमली आहे. त्या समितीने जर विलिनीकरण करा असे सांगितले तर शासन विलिनीकरणाला तयार आहे. याबरोबरच विलिनीकरण नको असे समितीने सांगितले तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येतील असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याआधी सांगितले आहे. अनिल परब चांगले काम करत आहेत असे मत मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.
सभेतील निर्णय
सिंधुरत्न योजना करण्याचा निर्णय आजच्या जिल्हा नियोजन सभेत घेण्यात आला. याबरोबरच वेंगुर्ला येथे बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. या स्मारकासाठी 1 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात 97 लाख रूपयांचा हिस्सा नियोजन मंडळाचा असल्यामुळे त्याला आज प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख नद्या रमाई, तिलारी, तेरेखोल, सुख नदी, जानवली, भनसाळ यांचा गाळ काढून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या