(Source: ECI/ABP News/ABP Majha)
maharashtra government formation : बेसावध राहू नका! राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना सल्लावजा शुभेच्छा
Maharashtra Government formation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या शुभेच्छांसह राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
Maharashtra Government formation : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या शुभेच्छांसह राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवरू एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा . आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका... पुन्हा एकदा आपले अभिनंदन! असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळंल. काल (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं होतं. राज ठाकरेंचं हे ट्वीट उद्धव ठाकरे यांना उद्देशून असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
"एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तव्य समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो." असे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते. सत्तांतरानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असून ट्विटरच्या माध्यमातून राज यांनी उद्धव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
महत्वाच्या बातम्या