एक्स्प्लोर

Maharashtra Government formation : ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून; मोदी, शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी

Maharashtra Government formation : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणारे देंवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.

Maharashtra Government formation : एकनाथ शिंदे (Eknath shinde)  यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणारे देंवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. आधी मुख्यमंत्री आणि नंतर इतर मंत्री अशी अनेक उदाहरणे राज्यात यापूर्वी होती. परंतु, मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस राज्यातील एकमेव नेते आहेत. 

राज्यपालांना भेटल्यानंतर आज दुपारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. यावेळी आपण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु, दुपारच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असतील अशी माहिती दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यांतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री पद भुषवले. परंतु, 2019 मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे त्यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.  त्यानंतर त्यांनी अनेकवेळा आपण पुन्हा येऊ असे देखील सांगितले. 2019 मध्येच त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, त्यावेळी त्यांना फक्त 80 तास मुख्यमंत्री पदावर राहता आले. 

अजित पवार यांनी पाठिंबा काढून घेतला आणि  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आघाडी करत सरकार स्थापन केले. त्यामुळे 2019 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यातच 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकाच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठी भाजपच्या हालचाली देखील सुरू झाल्या. परंतु, आज अचानकच एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच धक्का दिला. 

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करताना आपण मंत्रिमंडळात सामिल होणार नसल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. केंद्रीय नेतृत्वाकडून  फडणवीस यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर अमित शाह यांना यात यश मिळाले. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर केले. ट्विट करून अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली. "देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रासाठी निष्ठा आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत, असे ट्विट अमित शाह यांनी केले.   

1978 मध्ये महाराष्ट्रला पहिले उपमुख्यमंत्री लाभले होते. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहित पाटील, आर आर पाटील आणि अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अजित पवार यांनी सर्वाधिक चार वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Ganeshotsav Toll free pass : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी  खूशखबर! टोल मोफत!
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी  खूशखबर! टोल मोफत!

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget