एक्स्प्लोर

आधी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे स्मरण मग शपथविधी, उद्धव ठाकरेंची परंपरा एकनाथ शिंदेंकडून कायम

महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Maharashtra New Govt. : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. एकनाथ शिंदेनी देखील आजच्या शपथविधीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत शपथ घेतली. एकनाथ शिंदे शपथविधीसाठी नेहमीप्रमाणे आपल्या पांढऱ्या रंगाच्या पोशाखात आले होते. 

एरवी कोणतेही मंत्री शपथ घेताना राज्यपालांनी 'मी' म्हणून निर्देश दिल्यानंतर त्यापुढे त्यांचं नाव घेऊन शपथ घेत असतात. पण उद्धव ठाकरे यांनी असं न करता वेगळ्या प्रकारे शपथेची सुरुवात केली. त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे  या शब्दांनी शपथेची सुरूवात केली. शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली. शपथविधी अगोदर  त्यांनी उपस्थित जनतेला नमस्कार करत  सर्वांना अभिवादन केलं.

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी  त्यावेळी केला होता. महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्र्यांनी त्यावेळी शपथविधीअगोदर वेगळी नावे घेतली होती. शपथविधीविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली होती. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली होती. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

संबंधित बातम्या :

Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ शिंदे शपथ घेतो की...., एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार 

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक, शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डीपी बदलला

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Embed widget