एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. आज 18 आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ.

Maharashtra Cabinet Expansion : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच... लवकरच... म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी शिंदे-फडणवीस गटातील काही महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळाच्या फायनल यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नव्हतं. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. या 18 जणांमध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. 

अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारा मुहुर्त गवसला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. त्यासाठी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ठाकरे गटात मंत्री असणाऱ्या अनेक आमदारांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या आमदार यामीनी जाधव, लता सोनवणे यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, भाजपच्या गोटातून मंदा म्हात्रेंची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, मंत्रिपदी वर्णी लागणाऱ्या फायनल आमदारांच्या यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

मंत्रिपदी कोणाची वर्णी? 

शिंदे गटातील मंत्री 

  1. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
  2. उदय सामंत (Uday Samant)
  3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
  4. दादा भुसे (Dada Bhuse)
  5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
  6. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
  7. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
  8. संजय राठोड (Sanjay Rathod)
  9. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपकडून मंत्री

  1. गिरीश महाजन (Girish Mahajan)
  2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
  3. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
  4. सुरेश खाडे (Suresh Khade)
  5. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
  6. अतुल सावे (Atul Save)
  7. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
  8. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
  9. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget