Kas Pathar : महाबळेश्वरात सापडली 16 वर्षानंतर फुलणाऱ्या 'सुपुष्पा' फुलांची जात
Kas Pathar : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावाने ओळखले जाणारे हे दुर्मिळ फुल तब्बल 16 वर्षानंतर उमलते.
सातारा : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने असं काही भरभरून दिलं आहे की ते शब्दात सांगणं तसं कठीणच आहे. या निसर्गात अनेक चमत्कारही पहायला मिळतात. याच चमत्कारातील एक अभूतपूर्व चमत्कार पहायला मिळाला तो म्हणजे महाबळेश्वरातील काही पर्वतरांगांमध्ये नव्याने एका फुलाचा शोध लागला. हे फुल असं आहे की ते तब्बल 16 वर्षानंतर उमलते. (Kas Pathar species of Supushpa flower found).
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे कास पठार. या कास पठारावरच्या अनेक कारवी टोपलीची फुलं तुम्ही पाहिली असतील. यातील काही फुलं ही एक वर्षानंतर, काही फुलं तीन वर्षानंतर तर काही फुलं सहा वर्षानंतर फुलतात. मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावाने ओळखले जाणारे हे दुर्मिळ फुल तब्बल 16 वर्षानंतर उमलते. ते फुल महाबळेश्वर परिसरातील दोन ठिकाणी उमलेले पहायला मिळाले.
फुलपाखरे आणि मधमाशा यांच्यामार्फत या फुलांचे परागकण पसरावेत म्हणून हा संपूर्ण परिसर वन विभागाने निर्मनुष्य केला आहे.
सुपुष्पा आणि पिचकोडी या नावाने ओळख असलेल्या या फुलांचा बहर जेव्हा संपतो तेव्हा हे संपूर्ण झाड जळून जाते आणि या फुलांच्या बिया परिपक्व होण्यासाठी तब्बल सहा महिने लागतात. नंतर या बिया रुजून नव्याने झाड तयार होते. तयार झालेल्या झाडाला 16 वर्षानंतर फुलं येतात आणि हा सोनेरी क्षण सध्या अनुभवण्यासाठी पर्यटक येऊ लागलेत. मात्र या पर्यटकांवर आता बंदी घातण्यात आली आहे. त्यामुळे फक्त महाबळेश्वराच्या सृष्टीचा अभ्यास करण्यासाठी आलेले पर्यटक गेटवरुनच परतत आहेत.
संबंधित बातम्या :