अधिवेशनात सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामपंचायत बंद ठेवू, सरपंच परिषदेचा इशारा
सरपंच परिषद मुंबई आणि जळगाव यांच्यावतीने जळगाव येथे सरपंच मेळावा आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच परिषदेने शासनाला इशारा दिला आहे.
जळगाव : मागील काही काळापासून महाराष्ट्रातील सरपंच आपल्या काही मागण्यांसाठी सरकारकडे मागणी करत आहेत. पण आता सरपंच परिषदेने आक्रमक पवित्रा घेत येत्या अधिवेशनात सरपंचांच्या विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष दिले नाही तर ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. सरपंच परिषद मुंबई आणि जळगाव यांच्यावतीने जळगाव येथे सरपंच मेळावा आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचवेळी हा इशारा देण्यात आला.
दत्ता काकडेंनी मांडल्या सरपंचाच्या मागण्या
या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील ,खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हान यांच्यासह सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आणि पद्मश्री पोपटराव पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना दत्ता काकडे यांनी सरपंचाच्या मागण्यांबाबत बोलताना सांगितलं की, ''सरपंच हा गावात अहोरात्र काम करणारा व्यक्ती आहे. पण त्याला मिळणारे वेतन अतिशय कमी आहे. त्यामुळे ते वाढवून मिळाले पाहिजे. तसंच वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येऊ नये, याशिवाय पॅनल बंदी कायदा व्हायला पाहिजे. मुंबई मध्ये सरपंचभवन असावे आणि वित्त आयोगाच्या आलेल्या रकमेचा खर्च कसा करावा याचे अधिकार गावाला मिळायला पाहिजे.'' याशिवायही काही मागण्या असल्याचं काकडेंनी सांगितलं. तसंच याकडे शासनाने लक्ष न दिल्यास ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा विचार करत असल्याचंही ते म्हणालेय
'तरचं गावं स्वावलंबी होतील'
पद्मश्री मिळाल्यानंतर प्रथमच सरपंच मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव येथे आलेल्या हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही यावेळी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ''भारत हा खेड्यांचा देश आहे, गांधीजींनी ही खेड्या कडे चला असं म्हटलं होतं. ग्रामपंचायतींचा विकास करायचा असेल तर जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मिळून एकत्ररित्या काम केले पाहिजे तरच स्वावलंबी गावं बनू शकतील.''
हे ही वाचा
- भाजप आमदाराचा आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप
- कोरोनामुळे मृत्यू 1600 पण मदतीसाठी अर्ज 3000, अमरावती जिल्ह्यातील प्रकार, पालिका प्रशासन अचंबित
- उत्तर प्रदेश-गोव्यात शिवसेना काँग्रेससोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले....
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha