भाजप आमदाराचा आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप
Goa News : पणजीमधील भाजप आमदाराने आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत.
Goa News : पणजीमधील भाजप आमदाराने आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. आमादाराच्या या आरोपानंतर गोव्यातील राजकारणात तापलं आहे. पणजीचे आमदार बाबुश मोन्सरात यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (deepak pawaskar) यांनी अभियंत्यांच्या नोकरीसाठी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर स्थानिक पक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार मेन्यू कार्ड सरकार आहे. आम्ही जे आरोप करत होतो, त्याला सत्ताधारी पक्षातील आमदारानेच दुजोरा दिलाय, असे सरदेसाई म्हणाले.
मंत्री दीपक पाऊसकर यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा पणजीचे आमदार बाबुश मोन्सरात यांनी केलाय. पुढील काही दिवसांत सर्व पुरावे लोकांसमोर आणणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. शनिवारी बाबुश मोन्सरात यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी बाबुश यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तयार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावावर पुन्हा एकदा विचार करावी, अशी मागणी केली आहे. विजय सरदेसाई यांनी यासंदर्भात सरकारवर टीका करताना गोवेकारांना लुटणारे हे सरकार असा आरोप केला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या प्रकरणाची चौकशी कऱण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बाबुशनी यांच्या आरोपानंतर सरदेसाई यांनी ट्वीट करत म्हटलेय की, 'मंत्री दीपक पाऊसकर यांच्या भ्रष्ट्राचारकांडाची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. त्याशिवाय न्यायालयातही याचिका दाखल करणार आहे. ' गोवा फॉरवर्डकडून तक्रारीचा मसुदा तयार करणे सुरु आहे. सोमवारपर्यंत आम्ही ही तक्रार दाखल करू, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी दिली.
We @GoaforwardParty will approach @ECISVEEP & High Court of Bombay at Goa with regards to the recruitment scam.
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) December 11, 2021
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live