(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : राज्यात पंतप्रधान मोदीसह शाह, योगीजी येऊन देखील त्यांचा प्रभाव नाही; मतदारांचा कौल आमच्या बाजूनेच, नाना पटोलेंची गॅरंटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत अनेक सभा आणि रोड शो घेतलेत. त्यांच्या पाठोपाठ अमित शाह, योगीजी आलेत. पण त्यांचा कुठेही प्रभाव दिसून आला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केलीय.
Nana Patole On PM Narendra Modi : देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीच्या मतदानाची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी उद्या पार पडणार आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान हे उद्या 20 मे रोजी पार पडणार आहे. त्यात मुंबईतील 6 जागंसाठी मतदान होणार आहे. तर येत्या 4 जून रोजी या मतदानाचा अंतिम निकाल लागणार आहे. अशातच या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) विजय होईल, असा विश्वास काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदीसह शाह, योगीजी कुणाचाच प्रभाव नाही- नाना पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत अनेक सभा आणि रोड शो घेतलेत. त्यांच्या पाठोपाठ अमित शाह आले, योगीजी आलेत. पण त्यांचा कुठेही प्रभाव दिसून आला नाही. रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदी यांनी मुंबईला वेठीस धरण्याचा काम केलं. गुजरातवरून आणि बाहेरून लोक आणावे लागले. उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. उद्याच्या मतदानात मतदारांचा महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल दिसेल, असा विश्वास व्यक्त करत नाना पटोले यानी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला महाराष्ट्रातूनच महाराष्ट्र मुक्त करण्याचा शेतकरी, गोरगरिब जनतेने ठरवले आहे. त्यामुळे येत्या 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर हे चित्र सत्यात आलेले दिसेल, असे ही नाना पटोले म्हणाले.
नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्याबद्दल प्रचंड चीड- नाना पटोले
शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजपने मागील 10 वर्षात विकास केला, असा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळात कुठेही विकास न केल्यामुळे ते पटवून देण्यात अपयशी ठरले. भ्रष्टाचारी, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी, शेतकऱ्यांवरील अन्याय यावर ना देशाचे पंतप्रधान बोलले, ना राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. ही चीड आता मतातून व्यक्त होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादीच्या साठ-गाठमध्ये आम्हाला त्यात पडायचं नाही. 2004 मध्ये सर्वाधिक जागा मिळून अजित पवार नवखे असल्याच शरद पवार म्हणाले. मात्र, सध्याघडीला आम्हाला तानाशहा भाजपला शक्य तितके बाहेर काढणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शरद पवार किंवा अजित पवार काय बोलतात यात आम्हाला पडायचं नसल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्राला अधोगतिकडे नेण्याचे काम भाजपने केलंय. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र पुनर्स्थापित करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या