एक्स्प्लोर

मोठी बातमी : नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Dhule News : नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या  आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे असल्याचा विश्वासही यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

मोदींचे पाकिस्तानशी संबंध : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं म्हणत, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या 100 टक्के जागा पुढे असून, तिसऱ्या टप्प्यात आजच्या दिवशी देखील महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचं काम केलं

पवार कुटुंबियांच्या पारिवारिक वादात काँग्रेसला पडायचं नाही आणि त्यांच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवर बोलताना मत व्यक्त केलं आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासानंतर भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचं काम केलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लावत भाजपवर निशाणा साधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget