Air Pollution : दिवाळीत हवा बिघडली! आरोग्यावर वाईट परिणाम; राज्यातील हवा प्रदूषणाची परिस्थिती काय?
Poor Air Quality in Maharashtra : अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील धुलिकण कमी होऊन प्रदूषणात घट झाली होती. त्यानंतर दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे.
Maharashtra Air Pollution : मुंबईसह (Mumbai) राज्यात हवेची गुणवत्ता बिघडली (Air Quality) असून ही चिंताजनक बाब आहे. दिवाळी आधी हवेची पातळी (Air Quality Index) घसरली होती, त्यातच आता दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणात वाढ झाली होती. देशात मुंबई दिल्लीसह अनेक शहरांची हवा प्रदूषित झाली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील धुलिकण कमी होऊन प्रदूषणात घट झाली होती. त्यानंतर दिवाळीत मात्र वायू प्रदूषण पुन्हा वाढलं आहे.
हवेची गुणवत्ता बिघडली
दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवले. मुंबईमध्ये नागरिकांनी फटाके फोडण्याच्या पालिकेच्या नियमांचं पालन केलं नाही. अनेक ठिकाणी रात्री 8 ते 10 या वेळे व्यतिरिक्त दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील हवेची गुणवत्ताही घसरली आहे. मुंबई पुण्यासर राज्यभरात अनेक शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवाळीत फटाके फोडण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे वायू प्रदूषणासोबत ध्वनी प्रदूषणातही वाढ झाली आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली
मुंबई महापालिका प्रशासनाचे निर्बंध मुंबईकरांनी धाब्यावर बसवले. रात्री 8 ते 10 पर्यंत फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतांनाही मध्यरात्रीनंतरही मुंबईत आतिषबाजी सुरु होती. लक्ष्मीपूजनानंतर मुंबईची हवा जास्त प्रदुषित झाली आहे. दिवाळीपूर्वी समाधानकारक श्रेणीत असलेला एअर क्वालिटी इंडेक्स पुन्हा खराब श्रेणीत पोहोचला आहे. इतर दिवसांपेक्षा 50 टक्क्याहून जास्त संख्येनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
पुण्यातील हवा देखील बिघडली आहे. तर, काही परिसरात पडलेल्या पावसामुळे (Pune AQI Today) हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यातील (Pune Rain Update) कात्रज, खडकवासला, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरात काही प्रमाणात पाऊस पडला. मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची पातळी खराब असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं होतं.
राज्यातील हवा प्रदुषणाची काय परिस्थिती?
- अकोला - 180 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक)
- अमरावती - 107 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक)
- संभाजीनगर - 146 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक)
- चंद्रपूर - 215 (पीएम 2.5 प्रदूषकाची मात्रा अधिक)
- जळगाव - 138 (पीएम 10 ची मात्रा अधिक)
- कोल्हापूर - 179 (पीएम 10)
- नागपूर - 200 (पीएम 2.5)
- नाशिक - 176 (पीएम 2.5)
- मुंबई (सायन) - 137 (पीएम 10)
- नवी मुंबई - 206 (पीएम 10)
- पुणे - 263 (पीएम 2.5)
- सोलापूर - 295 (पीएम 2.5)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Air Quality Index : मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली! फटाक्यांची आतषबाजीचा फटका, 24 तासात 150 कोटींचे फटाके फुटले
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )