एक्स्प्लोर

Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!

Maha Vikas Aghadi Manifesto : राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर कोणताही विचार न करता योजना सुरु करण्यात आली, असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता.

Maha Vikas Aghadi Manifesto : महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार सत्तेवर आल्यास 100 दिवसांचा अजेंडाही सादर केला आहे. महाविकास आघाडीने महिला, शेतकरी, युवक, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, सुशासन आणि शहरी विकासाच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या सन्मानासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर कोणताही विचार न करता योजना सुरु करण्यात आली, असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता. यानंतर आता महाविकास आघाडीकडून योजनेतील पैसे वाढवण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रावर किती कोटींचा बोजा वाढणार याबाबत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. 

 

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योजनांसाठी पैशांची विचारणा केली असता ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला सरकार द्या, आम्ही तुम्हाला बजेट देऊ. मल्लिकार्जुन खरगे यांच्या या उत्तरानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे आणि नेहमी आक्रमक पावित्र्यात असणाऱ्या संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याचे दिसून आले. सुप्रिया सुळे यांनी टाळी वाजवून दाद दिली. यावेळी खरगे यांनी कर्नाटक पंचसूत्री योजनेवर कोणत्या पद्धतीने खर्च करण्यात येत आहे याबाबत माहिती दिली. 

वर्षभरात 500 रुपयांमध्ये सहा गॅस सिलिंडर दिले जाणार 

दरम्यान, महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात महिलांकडे विशेष लक्ष दिले आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवासाचीही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना वर्षभरात 500 रुपयांमध्ये सहा गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. महिलांसाठी शक्ती कायदा लागू केला जाईल. 9 ते 16 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत दिली जाईल. मासिक पाळीच्या दिवसात दोन दिवसांची रजा दिली जाईल.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कोणती आश्वासने दिली? 

आघाडीने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा आणि मुलांसाठीच्या सध्याच्या योजनेत सुधारणा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय पीक विमा योजनेतील अटी काढून विमा योजना सुलभ करण्याचे काम केले जाणार आहे.

शिक्षित बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंत भत्ता देण्याचे आश्वासन 

तरुण पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंत भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारच्या अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 'महात्मा फुले जन आरोग्य योजने'ची व्याप्ती वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विमा योजनांचा पुनर्विचार करून उपचार सुविधांचा विस्तार केला जाईल. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन औद्योगिक धोरण करणार

नवीन औद्योगिक धोरण करणार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात म्हटले आहे. महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाईल. राज्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget