मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला
मोदीसाहेब कर्जमापीचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. कारण ते भाषण करण्यात हुशार आहेत. मात्र, निर्णय घेण्यात नाहीत असे म्हणत शरद वार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
Sharad Pawar on PM Narendra Modi : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला होता. मात्र, आता मोदीसाहेब असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. कारण ते भाषण करण्यात हुशार आहेत. मात्र, निर्णय घेण्यात नाहीत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) टोला लगावला. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते.
काही लोकांनी आमची साथ सोडली आणि भाजपच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलोय. मात्र आता भुजबळ नावाचे मंत्री आहेत. ते सांगत आहेत, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकलं होंत म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. एक प्रकारे लाचारीच दर्शन घडलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे असं शरद पवार म्हणाले.
मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही
ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आल्याला पहिला का? असेही पवार म्हणाले. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते.
परांडा विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघाती लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. अत्यंत अटितटीची ही लढत होमार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या मतदारसंघात कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली होती. आज लगेच शरद पवार यांची जाहीर सभा झाली.
महत्वाच्या बातम्या:
मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार बॅटिंग