MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
MVA Vidhan Sabha Election Manifesto 2024: महाविकास आघाडीकडून विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रविवारी मुंबईत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मविआतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा (MVA MaharashtraNama) प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक महत्त्वाची गोष्ट जाहीर केली. विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यास मविआ महाराष्ट्रात जातीय जनगणन करेल. तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल, यामुळे ओबीसी समूहातील वंचित घटकांना मोठा फायदा होईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. (MVA Vidhan Sabha Election Manifesto 2024)
आम्ही कालपासून तेलंगणाता जातीय जनगणनेला सुरुवात केली आहे. जनगणनेचा डेटा गोळा करण्यासाठी 80 हजार स्वयंसेवकांना कामाला लावण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी घरोघरी फिरुन माहिती गोळा करत आहेत. आमची जातीय जनगणना समाजात फूट पाडण्यासाठी नाही. तर प्रत्येक समाजामध्ये किती पदवीधर आहेत, दरडोई उत्पन्न किती आहे, त्यांची शेती किती आहे? किती जण सरकारी नोकरी किंवा खासगी क्षेत्रात आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेता येतील. प्रत्येक समाजाबाबत माहिती मिळाल्यानंतर संबंधित जातींना किती सवलत देता येईल आणि वंचितांना वर आणण्यासाठी काय करता येईल, हे धोरण आखता येतील, हे जातनिहाय जनगणनेचे मूळ उद्दिष्ट असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
मोदींनी द्रौपदी मुर्मू यांना मतं मिळवण्यासाठी राष्ट्रपती केलं: खरगे
नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केले आणि आता त्यांच्या नावावर मतं मागत आहेत. मोदींनी मुर्मू यांना राष्ट्रपती केले ही चांगली गोष्ट आहे. पण सार्वजनिक व्यासपीठावर त्यांचं नाव घेऊन मतं मागितली जातात. मुर्मू यांना राष्ट्रपती करणे तुमच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यामध्ये जाहिरात करण्याची गरज काय? आम्ही कधी मोदी ओबीसीतील तेली समाजातून आले आहेत, असे बोललो का? काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटात प्रत्येक समाजाचे लोक आहेत, असे खरगे यांनी म्हटले. मोदी सरकारने किती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना महत्त्वाची खाती दिली? या सगळ्यांना केवळ राज्यमंत्री करण्यात आले. मात्र, काँग्रेसच्या कार्यकाळात सर्व जातीजमातीच्या नेत्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते, असा दावा खरगे यांनी केला.
मविआच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
1. महिलांना वर्षाला 6 सिलेंडर, सिलेंडरची किंमत 500 रुपये
2. महिला गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, त्यासाठी राज्यात शक्ती कायदा लागू करणार
3. 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
4. उद्योग स्थापन करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी नवे औद्योगिक धोरण तयार करणार
5. दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार, एमपीएससीसेला भरती प्रक्रिया सुरु करायला सांगणार
6. चैत्यभूमी आणि इंदू मिल स्मारकाच्या कामकाजाला तातडीने सुरुवात करु
आणखी वाचा
प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा