निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा मास्टरस्ट्रोक, माढा मतदारसंघातील साखरसम्राटांचे धाबे दणाणले
अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढविण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास एक लाख पंधरा हजार मतदान आहे. याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो .
![निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा मास्टरस्ट्रोक, माढा मतदारसंघातील साखरसम्राटांचे धाबे दणाणले Abhijit Patil masterstroke in election, Madha Constituency sugarCane 3500 rupees price announced Marathi News निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा मास्टरस्ट्रोक, माढा मतदारसंघातील साखरसम्राटांचे धाबे दणाणले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/6bfde2f0a51cc7b2829d2cf7a271dbd0172587742187089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (shri vitthal sahakari sakhar karkhana) रोलर पूजा कार्यक्रमात चालू गळीत हंगामासाठी 3500 रुपयांचा भाव जाहीर करीत मास्टरस्ट्रोक लागवल्याने अनेक साखर सम्राटांचे धाबे दणाणले. आहेत. आता किमान तेवढा दर देण्याची वेळ जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर येणार आहे. अभिजित पाटील यांच्या घोषणेनंतर शेतकरी सुखावला असून आता इतर नेत्यांच्या कारखान्यांनी हाच भाव देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढविण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास एक लाख पंधरा हजार मतदान आहे. याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो . गेल्यावर्षी अभिजित पाटील यांनी तब्बल 10 लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 3 हजार रुपये प्रतिटन एवढा भाव दिला होता . आता यावर्षी रोलर पूजन कार्यक्रमातच पाटील यांनी या हंगामात 3500 रुपये भाव देण्याची घोषणा केल्याने माढ्याचे साखर सम्राट व आमदार बबनदादा शिंदे , पंढरपूरचे परिचारक , अकलूजच्या मोहिते पाटील अशा नेत्यांनाही अशाच पद्धतीने भाव द्यावा लागणार आहे . एकाबाजूला अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेसाठी जोरदार तयारी करीत सातत्याने माढा मतदारसंघ पिंजून काढत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या हंगामाचा विक्रमी भाव जाहीर केल्याने हा त्यांच्यासाठी मास्टरस्ट्रोक ठरणार आहे .
अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले
यामुळे आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या बबनदादा शिंदे अथवा दादासाहेब साठे या दोन्ही साखर कारखानदाराना अभिजित पाटील यांच्याप्रमाणेच भाव द्यावा लागणार आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून तो राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे. आमदार शिंदे यांचे राजकारणाचा बेसही ऊस उत्पादक शेतकरी असून आता त्यांच्या टाकाटीवरच अभिजित पाटील यांनी घाव घालण्यास सुरुवात केल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे . यातच अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे माढा मतदारसंघात येत असल्याने या घोषणेमुळे अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले आहे .
हे ही वाचा :
बापाचा हल्लाबोल अन् अजित पवारांचा इशारा, तरीही आत्रामांच्या लेकीचा निर्णय पक्का; 'या' दिवशी शरद पवार गटात करणार प्रवेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)