एक्स्प्लोर

सदोष किट प्रकरणी खोलवर माहिती न घेता आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य : अमित देशमुख

राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत टोपेंनी हात झटकले होते. त्यावर अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जालना : राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. सदोष पीसीआर किट्स प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अमित देशमुख यांनी म्हंटलं आहे.

राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत टोपेंनी हात झटकले होते. त्यावर आज अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. टोपेंनी खोलवर माहिती न घेता हे वक्तव्य केलं असल्याचं देशमुख यांनी म्हंटलं आहे.

राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले होते. या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं होतं. तसेच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

राज्यात साडेबारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित : आरोग्यमंत्री

काय म्हणाले होते आरोग्यमंत्री?

यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, "GCC Biotech Ltd कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की GCC Biotech Ltd च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर 27 टक्क्यांपर्यंत खाली आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली जाईल."

पाहा व्हिडीओ : राज्यात साडेबारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित : आरोग्यमंत्री

अर्जुन खोतकर यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

यासंदर्भात अर्जुन खोत यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "महाराष्ट्रातील विविध आरटीपीसीआर लॅबरेटरीमध्ये पाच ऑक्टोबरपासून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं बोललं जातं. परंतु वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. याचं एकमेव कारण म्हणजे चाचणी किट्स सदोष आहेत. आयएमसीआर तपासणीत कंपनीने पुरवलेले किट्स सदोष असल्याचं सिद्ध झालं आहे. ही अतिशय गंभीर बाब असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळणार नाही आणि ते बाहेर फिरल्यास संसर्ग वाढेल. त्यामुळे याची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती."

आरटी पीसीआर किट्स हा घोटाळा : बबनराव लोणीकर

आरटी पीसीआर किट्स हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. "12 लाख 50 हजार किट्स खरेदी केल्या. किट्स वापरायच्या थांबल्या. आता याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. ही सामुदायिक जबाबदारी आहेत. ही किट्स वापरुन जनतेच्या जिवाशी खेळ केला. रोज जालना जिल्ह्यात रोज 200 ते 250 पॉझिटिव्ह येत होते. पण ही किट्स वापरण्यास सुरुवात केल्यावर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत आला. या किट्स सदोष आहेत. यामुळे आकडे खाली आले असं एनआयव्हीने लक्षात आणून दिलं," असं लोणीकर म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget