एक्स्प्लोर

राज्यात साडेबारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित : आरोग्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी तब्बल साडे बारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

जालना : राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.

या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनी ला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. तसंच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे काय म्हणाले? यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, "GCC Biotech Ltd कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की GCC Biotech Ltd च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर 27 टक्क्यांपर्यंत खाली आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली जाईल."

राज्यात साडेबारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित : आरोग्यमंत्री

अर्जुन खोतकर यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र यासंदर्भात अर्जुन खोत यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घातून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "महाराष्ट्रातील विविध आरटीपीसीआर लॅबरेटरीमध्ये पाच ऑक्टोबरपासून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं बोललं जातं. परंतु वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. याचं एकमेव कारण म्हणजे चाचणी किट्स सदोष आहेत. आयएमसीआर तपासणीत कंपनीने पुरवलेले किट्स सदोष असल्याचं सिद्ध झालं आहे. ही अतिशय गंभीर बाब असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळणार नाही आणि ते बाहेर फिरल्यास संसर्ग वाढेल. त्यामुळे याची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती."

आरटी पीसीआर किट्स हा घोटाळा : बबनराव लोणीकर आरटी पीसीआर किट्स हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. "12 लाख 50 हजार किट्स खरेदी केल्या. किट्स वापरायच्या थांबल्या. आता याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. ही सामुदायिक जबाबदारी आहेत. ही किट्स वापरुन जनतेच्या जिवाशी खेळ केला. रोज जालना जिल्ह्यात रोज 200 ते 250 पॉझिटिव्ह येत होते. पण ही किट्स वापरण्यास सुरुवात केल्यावर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत आला. या किट्स सदोष आहेत. यामुळे आकडे खाली आले असं एनआयव्हीने लक्षात आणून दिलं," असं लोणीकर म्हणाले.

Rajesh Tope On Vaccine | कोरोना लस देण्यासाठीच्या तयारीला वेग : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget