धक्कादायक! नराधम सावत्र बापानेच पाच वर्षीय मुलीवर केला लैंगिक अत्याचार, बापाला तासाभरातच अटक
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना अकोला (Akola) जिल्ह्यातून समोर आली आहे. शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे.
Akola Crime News : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना अकोला (Akola) जिल्ह्यातून समोर आली आहे. शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे. या पाच वर्षीय चिमुकलीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर असून खदान पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केली आहे.
नराधम बापाला काही तासातच खदान पोलीसांकडून अटक
हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला काही तासातच खदान पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती, याचीच संधी साधून सावत्र बापाने आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे पोट जास्त दुखू लागल्याने तिने आई घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता संपूर्ण प्रकार समोर आलाय.
महत्वाच्या बातम्या:

























