एक्स्प्लोर

Amravati Crime: गर्लफ्रेंडचे लग्न ठरत असल्याचं कळताच प्रियकर संतापला, वडिलांवर जीवघेणा हल्ला, आईलाही सोडलं नाही ;अमरावतीत खळबळ

सोमवारी दुपारी एका मुलाने तिला पाहण्यासाठी घर गाठले. ही बाब समजताच माजी प्रियकर भारत संतापला. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

Amaravati: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीचे लग्न ठरण्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या माजी प्रियकराने संतापातून थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून आईलाही मारहाण करण्यात आली आहे. (Crime  news)

लग्न ठरण्याचा राग, प्रियकराचे संतापजन्य कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत (32) नावाच्या तरुणाचे एका मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी त्याने त्या मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मुलगी तेलंगणातून परत आणल्यानंतर भारत तीन महिने तुरुंगातही राहिला होता.काही दिवसांपूर्वी ती मुलगी 18 वर्षांची झाली आणि कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरू केली. सोमवारी दुपारी एका मुलाने तिला पाहण्यासाठी घर गाठले. ही बाब समजताच माजी प्रियकर भारत संतापला.

धारदार शस्त्रांनी हल्ला

संध्याकाळी जेवणानंतर मुलीचे वडील फेरफटका मारत बाहेर गेले असताना भारत आणि त्याचा साथीदार अक्षय (३०) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत वडिलांच्या हात, डोके आणि बोटांना दुखापत झाली आहे. मुलीच्या आईने पतीच्या मदतीसाठी धाव घेतली असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यादरम्यान मुलीच्या वडिलांनी स्वतःचा बचाव करताना विट मारून भारतला जखमी केले. त्याचे दात पडले असून तोही गंभीर अवस्थेत आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हे दाखल, आरोपी पसार

या घटनेत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भारत आणि अक्षयविरुद्ध प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि मारहाण अशा कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. सध्या भारत उपचार घेत आहे, तर अक्षय फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे यांनी दिली.या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, एका मुलीच्या लग्नाच्या रागातून घडलेला हा हिंसक प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget