सैफ अली खान हल्लाप्रकरणामुळे लग्न मोडले, पण फैजानभाई मदतीला धावले; आकाशला पैसे दिले, लग्नाचा खर्चही उचलला
सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या संशयावरून पकडलेल्या आकाश कनोजियाला सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांनी 11,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
Saif ali khan stabbing case : सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या संशयावरून पकडलेल्या आकाश कनोजियाला सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांनी 11,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तसेच त्याच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली आहे. याबाबत बोलताना आकाश कनोजिया म्हणाला की, माझी सुटका झाली पण माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आकाश कनोजियाचे लग्न मोडले होते. तसेच त्याला नोकरीवरुन देखील काढून टाकण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी फक्त सॉरी बोलून मला सोडले, पण त्यांच्या माफीने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आकाशने सांगितले.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या तपासात मुंबई पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन अनेकांची चौकशी केली होती. त्यापैकी आकाश कनोजिया हा देखील अशाच लोकांपैकी एक होता. ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबत आकाश कनोजियाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जरी नंतर मला सोडून दिले असले तरी जीवनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे त्याची नोकरी गेली आणि त्याचे लग्न मोडले आहे. आकाश कनोजिया हा 32 वर्षांचा आहे. आकाश हा मुंबईतील कुलाबा कफ परेडमधील एका झोपडपट्टीत राहतो.
आकाश कनौजियाची आणि त्याच्या कुटुंबीयांची बदनामी
सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईमुळे आकाश कनौजिया या युवकाचे आयुष्य उध्वस्त झाले असून कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केवळ संशयित म्हणून आकाशला ताब्यात घेतल्याने सर्वत्र त्याची व त्याच्या कुटुंबीयांची बदनामी झाली. याशिवाय त्याचं जमलेलं लग्नही मोडल्याची ह्रदयस्पर्शी कहाणी आकाशच्या आई-वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली होती. दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक केली असून शहजाद असं त्याचं नाव आहे. या चोरी व हल्ल्याच्या घटनेतील खरा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो पैसे चोरण्याच्या उद्देशानेच सैफच्या घरी आल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. मात्र, एका सेलिब्रिटीवरील हल्ल्याच्या आरोपीचा शोध घेताना पोलिसांकडून झालेली चूक एका सर्वसामान्य निष्पाप कुटुंबीयांच्या आयुष्यात मोठं दु:ख घेऊन आल्याचं दिसून येत आहे. केवळ एका आरोपामुळे आयुष्य कसं बदललं, किती मोठा आघात कुटुंबीयांवर झाला हे आई वडिलांनी सांगितलं. आकाश कनौजिया असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईत नोकरी करत होता. मात्र, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याला छत्तीसगडमधील दुर्ग स्टेशनवरून संशयीत म्हणून 18 जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांकडून 19 तारखेला मुख्य आरोपी म्हणून शहजादला अटक करण्यात आली. त्यानंतर, आकाशला सोडून देण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
