Prashant Kishor Net Worth: स्वत:च्या जन सूरज पक्षाला तब्बल 99 कोटी दिले अन् 51 कोटींचा टॅक्स भरला; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर कितीशे कोटींचे मालक?
Prashant Kishor Net Worth: जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी त्यांच्या उत्पन्नाचा खुलासा केला. त्यांनी तीन वर्षांत ₹241 कोटी कमावले, ₹31 कोटी जीएसटी, ₹20 कोटी आयकर भरला.

Prashant Kishor Net Worth: बिहार निवडणुकीत (Bihar Election 2025) चर्चेचा केंद्रबिंदू असलेल्या जन सुराज पक्षाचे (Jan Suraaj Party) संस्थापक आणि सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या उत्पन्नाचा (Prashant Kishor Income) जाहीर खुलासा केला आहे. कमावलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब सरकारी तपासणीखाली असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. “जन सुराज पक्षाचा निधी पारदर्शक आणि स्वच्छ आहे. मी सल्लागार म्हणून काम केले आणि माझ्या कामासाठी शुल्क आकारले. मी तीन वर्षांत 241 कोटी रुपये कमावले, 31 कोटी रुपये जीएसटी म्हणून आणि 20 कोटी रुपये आयकर म्हणून भरले आणि 98.5 कोटी रुपये चेकद्वारे जन सुराज पक्षाला दान केले.” असे प्रशांत किशोर म्हणतात. इतरांसारखा मी 'चोर' नाही, उत्पन्न कुठे खर्च झाले याबद्दल बोलू शकतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.
मी बिहारमध्ये पैसे कमविण्यासाठी आलो नाही (Prashant Kishor Bihar Politics)
प्रशांत किशोर म्हणतात, “मी बिहारमध्ये पैसे कमविण्यासाठी आलो नाही. मी कमावलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब सरकारी तपासणीखाली आहे. व्यवस्था बदलेपर्यंत मी पुढील 10 वर्षे बिहारमध्येच राहीन,” प्रशांत किशोर म्हणाले की त्यांनी राजकीय पक्ष, संस्था किंवा कंपनीला सल्ला देण्यासाठी कधीही कोणतेही शुल्क घेतले नाही परंतु जेव्हा ते राजकारणात आले तेव्हा त्यांनी समाजासाठी पैसे कमविण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. “मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. ईडी किंवा इतर कोणत्याही एजन्सीला माझ्या कमाईची चौकशी करू द्या.” “भ्रष्ट राजकारण्यांची बाजू घेण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन,” असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी भाजप-जेडी(यू)-नेतृत्वाखालील एनडीए आणि आरजेडी-काँग्रेस-नेतृत्वाखालील महाआघाडी या दोन्हींवर सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
सल्ला देण्यासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क (Prashant Kishor Consultancy Fees)
दुसरीकडे, जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी त्यांच्या निवडणूक रणनीतीकाराच्या काळात राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना सल्ला देण्यासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारल्याचे उघड केलं आहे. बिहारमधील आगामी पोटनिवडणुकांसाठी एका निवडणूक रॅलीत बोलताना किशोर यांनी त्यांच्या प्रचारासाठी ते कसे आर्थिक मदत करतात हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की एका निवडणुकीत एका राजकीय पक्षाला सल्ला देण्याचे त्यांचे शुल्क पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्या प्रचारासाठी पुरेसे आहे.
दहा सरकारे माझ्या रणनीतींवर चालत आहेत (Prashant Kishor Political Strategist)
प्रशांत किशोर म्हणतात, "वेगवेगळ्या राज्यांमधील दहा सरकारे माझ्या रणनीतींवर चालत आहेत, तुम्हाला वाटते का माझ्याकडे माझ्या प्रचारासाठी तंबू आणि छत लावण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत? तुम्हाला वाटते का की मी इतका कमकुवत आहे? जर मी फक्त एका निवडणुकीत एखाद्याला सल्ला दिला तर माझी फी 100 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे. पुढील दोन वर्षांसाठी, मी अशाच एका निवडणूक सल्ल्यासह माझ्या प्रचारासाठी निधी देत राहू शकतो."
इतर महत्वाच्या बातम्या






















