एक्स्प्लोर
Voter List Row: 'सर्व पक्षांचे एकमत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका', Raj Thackeray यांचा निवडणूक आयोगाला इशारा
महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने आज दुसऱ्या दिवशीही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली, ज्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. 'सर्व राजकीय पक्षांचं जोपर्यंत एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका', अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मतदार याद्यांमधील घोळ, बोगस नावे आणि नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींवर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आमच्या शंकांचे निरसन झालेच पाहिजे, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे आणि त्यांनी उत्तरदायित्व टाळू नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. लोकशाही टिकवण्यासाठी ही चर्चा आवश्यक असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. या बैठकीनंतर सर्व पक्ष मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















