Jaisalmer bus fire: अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानानंतर आता एका एसी स्लीपर बसमध्ये अग्निकांड; तब्बल 20 जण जिवंत जळाले; डीएनए सॅम्पलसाठी फक्त हाडं गोळा करून आणली
राजस्थानातील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एसी स्लीपर बसला लागलेल्या भीषण आगीत 20 जण जिवंत जळाले. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू आहे. पीएम मोदी यांनी दुःख व्यक्त करून मदतीची घोषणा केली.

Jaisalmer Bus Fire: अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाचा थरकाप मनात जात नसतानाच आता राजस्थानमधील (Rajasthan accident) जैसलमेरमध्ये खासगी आराम बसला लागलेल्या भीषण आगीत 20 जण जिवंत जळाले. जळालेल्या 20 जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग (bus fire victims DNA sampling) सुरू झाले आहे. त्यांच्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहेत. जोधपूरमधील महात्मा गांधी रुग्णालय आणि जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात डीएनए सॅम्पलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा जैसलमेरहून 19 मृतदेह जोधपूरला आणण्यात आले. त्यापैकी फक्त हाडे असलेले एक गठ्ठा होते. एका व्यक्तीचा मृतदेह आधीच जोधपूरमध्ये होता.
जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एका एसी स्लीपर बसला आग (Jaisalmer Jodhpur highway bus fire)
मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एका एसी स्लीपर बसला (private AC sleeper bus fire) आग लागली. या अपघातात 20 प्रवासी जिवंत जळाले. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बसमध्ये जळालेली अडकली होते आणि काही जणांच्या मृतदेहाचा कोळसा झाला होता. पत्रकार राजेंद्र चौहान यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचाही मृत्यू झाला. आगीत पंधरा जण 70 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. जखमींमध्ये लग्नापूर्वीच्या शूटिंगनंतर जोधपूरला परतणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे.
बसमध्ये फटाके असल्याचा संशय (Jaisalmer fire investigation)
स्लीपर बसला आग लागण्याच्या कारणाबाबत विविध दावे केले जात आहेत. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे वृत्त होते. नंतर एसी कॉम्प्रेसर पाईप फुटल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, स्थानिकांचे म्हणणे आहे की बसचा डबा फटाक्यांनी भरलेला होता, त्यामुळेच आग लागली.
मृतांसाठी 2 लाख रुपये, जखमींसाठी 50 हजार रुपये (PM Modi condolence)
जैसलमेर बस अपघातात पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, "राजस्थानातील जैसलमेर येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे मला खूप दुःख झाले आहे."
मंत्री म्हणाले, "काही लोकांची राख झाली" (Gajendra Singh Khinvsar statement)
गजेंद्र सिंह खिंवसार म्हणाले, "मागून स्फोटाचा आवाज आला. आम्हाला वाटते की एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला." गॅस आणि डिझेल एकत्रित झाल्यामुळे मोठी आग लागली. फक्त एकच दरवाजा होता, त्यामुळे लोक अडकले. पुढच्या सीटवर बसलेले लोक पळून गेले. बसमधून जे काही मृतदेह सापडले ते सैन्याने बाहेर काढले. काहींचे वर्णनही करता येणार नाही, अशा पद्धतीने जळून खाक झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























