एक्स्प्लोर
Devendra Fadanvis Naxal Bhupati:भूपतीचे आत्मसमर्पण, हस्तांदोलनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढे केला हात
गडचिरोलीत (Gadchiroli) नक्षलवादाला मोठा धक्का बसला असून, टॉप कमांडर भूपतीसह (Bhupathi) ६० नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. तर दुसरीकडे, मुंबईत मतदार याद्यांमधील (Voter List) गोंधळावरून महाविकास आघाडी (MVA) आक्रमक झाली असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली आहे. 'शंभर अठ्ठ्याऐंशी लोकं एकच घरात राहतात, पण एकपण व्यक्ती तर प्रत्यक्षात राहत नाही,' असा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केला. गडचिरोलीत हिंसेचा मार्ग सोडून शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली असून, त्यांनी भारताचे संविधान स्वीकारले आहे. या सर्वांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दुसरीकडे, मतदार यादीतील त्रुटींवरून महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला असून, निकोप निवडणुकांसाठी सर्वपक्षीय चर्चेची मागणी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















