एक्स्प्लोर

Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत

IPS Puran Kumar Suicide Case : कामाच्या ताणामुळे, वरिष्ठांच्या दबावामुळे, वैयक्तिक कारणामुळे किंवा कोणत्यातरी घोटाळ्यात अडकल्यामुळे अनेक पोलिसांनी या आधी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे.

मुंबई : हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS पूरन कुमार (IPS Puran Kumar) यांच्या आत्महत्येमुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या घरातील साऊंडप्रूफ बेसमेंटमध्ये सर्व्हिस पिस्तूलाने गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. मात्र मृत्यूनंतरही त्यांचा पोस्टमॉर्टम (Postmortem) अद्याप झाला नव्हता. त्यांच्या सुसाइड नोट (Suicide Note) मध्ये त्यांनी 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांना जबाबदार ठरवले आहे.

कोण होते IPS पूरन कुमार? (Who Was IPS Puran Kumar)

पूरन कुमार हे मूळचे आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील होते आणि ते अनुसूचित जाती (SC) समुदायातून आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी राज्याच्या महानिरीक्षकांवर (DGP) भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्या मते, 2020 पासून त्यांच्यावरील अन्याय सुरू झाला होता. त्यांनी म्हटले की, त्यावेळचे DGP मनोज यादव यांनी त्यांच्या बदलीनंतर सतत अपमान आणि छळ केला.

सुसाइड नोटमध्ये त्यांनी नमूद केले की काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुट्ट्या नाकारल्या, वडिलांना भेटण्याची संधी दिली नाही. तसेच त्यांच्याविरोधात खोट्या तक्रारी (Fake Complaints) दाखल केल्या गेल्या. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्याकडून सरकारी वाहन (Official Vehicle) देखील काढून घेण्यात आले. आता हा छळ सहन होत नाही, म्हणून मी सगळं संपवण्याचा निर्णय घेतलाय असं पूरन कुमार यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.

मात्र अशा प्रकारची आत्महत्या करणारे पूरन कुमार हे काही पहिलेच आयपीएस अधिकारी नाहीत. त्यांच्या आधीही दोन आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

गेल्या 10 वर्षांतील IPS आत्महत्या (IPS Suicides in Last 10 Years)

2015 ते 2025 या कालावधीत देशात एकूण तीन IPS अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे नोंदवले गेले आहे.

1. के शशी कुमार (K. Sashi Kumar) – 2012 बॅच IPS अधिकारी, आंध्र प्रदेशातील पाडेरू (Paderu) येथे SP पदावर कार्यरत असताना जून 2016 मध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त 29 वर्षे इतकं होतं.

2. हिमांशू रॉय (Himanshu Roy) – 1988 बॅच महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी, मुंबई पोलिसांत जॉईंट कमिशनर (क्राईम) आणि नंतर ATS प्रमुख म्हणून कार्यरत. त्यांनी 11 मे 2018 रोजी कॅन्सरच्या दीर्घ आजारानंतर आत्महत्या केली.

3. पूरन कुमार (Puran Kumar) हरियाणातील 2013 बॅच IPS अधिकारी. 7 ऑक्टोबर 2025 रोजी आत्महत्या; सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget