एक्स्प्लोर

Ajit Pawar VIDEO : राष्ट्रवादीतील 'मुन्नी' कोण ते त्यांनाच विचारा, सुरेश धस यांचे नाव घेताच अजितदादा संतापले; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही बोलले

Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादीतील एक 'मुन्नी' अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांना आपल्यावर टीका करायला लावते असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. 

मुंबई : सुरेश धसांनी आरोप केलेली राष्ट्रवादीतील 'मुन्नी' कोण असा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा असं सांगत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. अमोल मिटकरींनी सुरेश धसांवर आरोप केल्यानंतर धसांनी राष्ट्रवादीतील मुन्नीची सुन्नी करणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलंय. त्यामुळे पक्ष वगैरे न पाहता कोणताही वरिष्ठ नेता यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

राष्ट्रवादीतील मुन्नी कोण? 

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले. अजित पवारांवरही त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केले. धस यांनीच जमिनी लाटल्या, खंडणी गोळा केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही सुरेश धस यांच्यावर आरोप केला होता.

मिटकरींच्या आरोपावर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरी किंवा सूरज चव्हाण हे लहाण मासे आहेत. त्यांना राष्ट्रवादीतील एक मुन्नी आरोप करायला सांगत आहे. त्या मुन्नीची मी सून्नी करणार असं धस यांनी म्हटलं होतं.

सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीतील मु्न्नी कोण असं अजित पवारांना विचारल्यानंतर ते चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.  

पुरावा सापडल्याशिवाय धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई नाही

बीड प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या प्रकरणात सीआयडी, एसआयडी चौकशी सुरू आहे. न्यायालयातही हा प्रश्न आहे. यामध्ये धनंजय मुंडे जर दोषी सापडले तर त्यांच्यावर कारवाई करणार. 

बीड प्रकरणात प्रत्येकाची चौकशी करून, आरोपींचा सीडीआर तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. राज्यात अशा प्रकारची घटना आजिबात खपवून घेणार नाही. विरोधी पक्षातल्या आणि सत्ताधारी काही नेत्यांनीही काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये अशी आपली भूमिका आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

बीड प्रकरणात जे नेते आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्याकडील पुरावे एसआयडी आणि सीआयडीकडे द्यावे. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं चुकीचं आहे. यात राजकारण आणू दिलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही.  फक्त या संबधित पुरावे सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे असं अजित पवार म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Embed widget