एक्स्प्लोर

महाराष्ट्र राज्य ठरले यंदाचे सर्वोकृष्ट कृषी राज्य, 11 जुलैला दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कृषीमंत्री धनंजय मुंडे स्विकारणार पुरस्कार

Agriculture State Award: महाराष्ट्र राज्याची यंदा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी निवड झाली असून ११ जुलैला हा समारंभ होणार आहे.

Agriculture Award: महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट 'कृषी राज्य पुरस्कार' (Agriculture State Award)जाहीर करण्यात आला आहे. येत्या ११ जुलैला दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्विकारणार आहेत. दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या 'ॲग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह' मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण कृषी क्षेत्राच्या समृद्धीला चालना

बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे उपक्रम राबवले असून १.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे १२३ मेगा सिंचनप्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

पुरस्काराला देशाविदेशातील मान्यवरांची राहणार उपस्थिती

ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत, तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.

पहिला पुरस्कार मिळाला होता आंध्र प्रदेशला

सन 2008 पासून या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता.

कोणकोणत्या कृषीमंत्र्यांनी भूषवलं या पुरस्काराचं अध्यक्षपद?

आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन, एम. एस. स्वामिनाथन इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आलेला असून स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. 2023 करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022 करिता तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

हेही वाचा:

कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Lalbaug Ganpati Darshan : माजी खासदार नवनीत राणा लालबागचा राजाच्या दर्शनालाSupriya Sule VS Ajit Pawar : माझ्या सकाळ उठण्याची चेष्ठा, सुळेंच्या टीकेला अजितदादांचं उत्तरSanjay Raut VS Ajit pawar : खंत वाटणे हे नाटक, संजय राऊतांचा अजित पवारांना टोलाAmol Mitkari On Ajit Pawar :  अजितदादांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणतात, दादांनी खंत व्यक्त केली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Manipur CM Biren Singh : दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
Embed widget