Red Chilli : मिरचीची 'लाली' उतरली, दरात तब्बल अडीच ते तीन हजार रुपयांची घट; शेतकरी अडचणीत
Red Chilli : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात अडीच महिन्यात लाल मिरचीच्या (Chilli) दरात जवळपास अडीच ते तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक फटका बसत आहे.
Red Chilli : सध्या मिरची उत्पादक शेतकरी ( Chilli Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण दरात मोठी घसरण झाली आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात अडीच महिन्यात लाल मिरचीच्या (Chilli) दरात जवळपास अडीच ते तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, एकीकडे मिरचीच्या दरात घट होत असली तरी चटणीचे दर मात्र तेजीत असल्याचं चित्र आहे.
नंदुरबार बाजार समितीत गेल्या अडीच महिन्यात मिरचीच्या दरात शंभर दोनशे रुपयांची नव्हे तर तब्बल तीन हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीच्या काळात ओली लाल मिरची सहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटरपर्यंत पोहोचली होती. आता मिरचीचे दर तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आधीच परतीच्या पावसाचा मिरचीला फटका, त्यात दरात घसरण
राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक वाया गेली होती. त्यामुळं खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला होता. नंदूरबार जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला होता. मिरची पिकाचेही मोठे नुकसान झाले होते. कोट्यावधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झालं होतं. हजारो क्विंटल मिरची पावसात सापडल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले होते. अशातच आता मिरचीच्या दरातही घसरण झाली आहे. त्यामुळं एकीकडं अतिवृष्टीचा फटका बसला असतानाच दुसरीकडे मिरचीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
वातावरणातील बदलाचा पिकांना फटका
सध्या राज्यातील तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. राज्यात कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नंदूबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील गहू , हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे कृषी विभागानं आहवान केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: