एक्स्प्लोर
सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडणार!
मुंबई: नोटाबंदीनंतर रांगेत उभं राहण्याची सवय लागलेल्या नागरिकांना आज काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळं बंद असलेल्या बँका सुरु होणार आहेत. त्यामुळं आज एटीएमबरोबरचं बँकांमध्ये गर्दी पहायला मिळू शकते.
सलग तीन सुट्ट्या आणि एटीएममध्ये असलेल्या खडखडाटामुळं लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले. मुंबई, पुणे असो किंवा विदर्भ आणि मराठवाडा कुठल्याही एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळं अर्थातच लोकांना खऱ्या अर्थी कॅशलेस झाल्याचा अनुभव आला.
तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला. साताऱ्यामधील जवळपास सर्वच बँकांची एटीएम तीन दिवसांच्या सुट्टी अधिपासूनच बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर सांगलीमध्येही जवळपास 80 टक्के एटीएम बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे नांदेडमध्येही एटीएमचे शटर डाऊन झाले असून, यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली होती.
तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येही नागरिकांची मोठी गौरसोय झाली. बँका बंद असल्याने नागरिकांना एटीएमच्या शोधात अनेकांना मोठी पायपीट करावी लागत होती.
पण आज सुट्ट्या संपत असून बँक कर्मचारी पुन्हा कामावर हजर होतील. त्यामुळे आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उठू शकते.
दरम्यान, नोटाबंदीचा आज 35 वा दिवस असून, सुट्ट्यापैशांचीही चणचण सर्वत्र कायम आहे. 2000 रुपयांच्या नव्या नोटांचे सुट्टे करताना नागरिकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement