एक्स्प्लोर
आरक्षणानंतर पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळालं
महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.
![आरक्षणानंतर पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळालं After getting reservation, got first Maratha Caste Certificate In Jalna आरक्षणानंतर पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळालं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/13082528/maratha-certificate.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.
वैभवनं अंबड तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या महा- ई- सेवा केंद्रात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं. वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र कसे असेल?
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. त्याचप्रमाणे ही दोन्ही प्रमाणपत्रं कशी असतील, याचे नमुने आधीच जारी केले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करुन 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले गेले. मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोयीचे व्हावे, यासाठी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाच्या जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जीआर जारी करुन मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गासाठी देण्यात येणारी जात प्रमाणत्रे ग्राह्य धरली जावी, असे आदेश काढले आहेत. या शासन निर्णयासोबतच जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र कसे असेल त्याचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे.![आरक्षणानंतर पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळालं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/07230610/Maratha-Cast-Verification-Certificate.jpg)
![आरक्षणानंतर पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळालं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/07230615/Maratha-Certificate.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)