एक्स्प्लोर
सांगली-जत मार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
समोरासमोर झालेल्या या धडकेत जयसिंगपूरच्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. जत तालुक्यातील लग्न कार्य आटोपून सांगलीकडे येत असताना हा अपघात झाला.

सांगली : सांगली-जत मार्गावर आज (रविवार) सायंकाळच्या सुमारास आयशर टेम्पो आणि अल्टो कारचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या या धडकेत जयसिंगपूरच्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
जत तालुक्यातील लग्न कार्य आटोपून सांगलीकडे येत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये विशाल माळी, सुभाष चव्हाण आणि लखन मोहिते यांचा समावेश असून तिघेही जयसिंगपूरचे आहेत. यात आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आयशर टेम्पो हा कवठे महाकाळमधून केळी भरुन जतकडे निघाला होता. यावेळी जतकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अल्टो कारने कोकळे गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अल्टो कारचा चक्काचूर झाला आणि कार टेम्पोच्या पुढील भागात घुसली.
पोलिसांनी आणि नागरिकांनी जेसीबी आणि दोराच्या सहाय्याने अल्टो कार टेम्पोखालून ओढून काढली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अहमदनगर
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
