एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/05/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/05/2018*
- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदान खोळंबल्याचा विरोधकांचा आरोप, फेरमतदानाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 40.37 टक्के मतदान https://goo.gl/nNLAkY
- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड, तर 46 गावांचा मतदानावर बहिष्कार, दुपारी 4 वाजेपर्यंत 31 टक्के मतदान https://goo.gl/c6PfNg
- बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण करा, मुख्य निवडणूक आयोगाची सूचना https://goo.gl/C5hs65
- कर्नाटकातील काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन, काँग्रेस आमदारांची संख्या 78 वरुन 77 वर https://goo.gl/Rcc39v
- केरळात मान्सून दाखल, राज्यातही वेळेत येणार, स्कायमेटची माहिती; पूर्व मोसमी पावसाची अनेक ठिकाणी हजेरी https://goo.gl/ykAw4c
- CBSE दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार http://abpmajha.abplive.in/
- गोव्यात निपाहचा पहिला संशयित रुग्ण आढळला, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु, केरळमधून संसर्ग झाल्याची शक्यता https://goo.gl/QDdKgk
- औरंगाबाद दंगलीनंतर अखेर सरकारला जाग, शहराला पूर्णवेळ पोलिस आयुक्त मिळाले, नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती https://gl/N8BnuG
- डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरेला अटक, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई, पुरंदरेंना आठ दिवसांची पोलिस कोठडी https://gl/6vrFtd
- ठाण्यात तरुणीला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथीयाला मनसे कार्यकर्त्यांचा बेदम चोप, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेची शक्यता https://goo.gl/gVktqr
- इंधनदरवाढ सलग पंधराव्या दिवशी सुरुच, पेट्रोल 12 पैशांनी महाग, मुंबईत पेट्रोलचा दर 86 रुपये 8 पैसे, तर डिझेल 73 रुपये 64 पैशांवर https://gl/c3HXjo
- आंध्र प्रदेशातील जत्रेत आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून आठ जण हवेत फेकले गेले, चिमुरडीचा मृत्यू, अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेऱ्यात कैद https://gl/Ga4PS4
- मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिसकडून मॅच फिक्सिंग, कतारच्या 'अल जझिरा' वाहिनीच्या अहवालात आरोप https://gl/EAA4bN
- 20 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल पत्नी मेहर जेसिया विभक्त, एकत्रितपणे स्टेटमेंट काढून घटस्फोटाचा निर्णय जाहीर https://gl/ZaMgHn
आणखी वाचा























