एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/07/2018*
- मुंबईत पावसाची उसंत, चर्चगेट-विरार वाहतूक सुरु https://goo.gl/t4BKiZ वसई-विरारमध्ये दीड दिवसापासून बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी विरार स्टेशनवर नागरिकांची झुंबड https://goo.gl/zbm8ag
- महावितरणला विक्रमी 30 हजार 842 कोटींचा तोटा, घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के दरवाढीचा प्रस्ताव, वीज बिलातून तोटा भरपाईची शक्यता https://goo.gl/meidJN
- नागपूर अधिवेशनात नाणार ग्रामस्थांचा शिवसेना आमदारांना घेराव, नेत्यांशी बाचाबाची, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आरोप https://goo.gl/ehnhmr
- मुंबईतील 4 हजार खड्डे बुजवल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा, तर खड्डेयुक्त रस्त्यांची ‘एबीपी माझा’कडून पडताळणी, ‘माझा’च्या रिअॅलिटी चेकमध्ये पितळ उघडं https://goo.gl/mVMR5w
- रात्री लांब पल्ल्याचा एसटी प्रवास झोपून करा, वर्षभरात महामंडळाच्या ताफ्यात एक हजार नॉन-एसी स्लीपर बस दाखल होणार https://goo.gl/1r6hz8
- पुण्यात 250 जॅक लावून चक्क 2000 स्क्वेअर फुटी बंगला उचलला, उंची वाढवण्यासाठी भारद्वाज बंगल्याच्या मालकाची कमाल https://goo.gl/kQW7qu
- महागड्या गाड्या चोरणारे पिंपरीतील इंजिनिअरिंगचे सहा विद्यार्थी अटकेत, 18 दुचाकी जप्त, मौजमजेसाठी चोरी https://goo.gl/5TvARB
- फी भरली नाही म्हणून केजीच्या चिमुकल्यांना पाच तास कोंडलं, दिल्लीच्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमधील धक्कादायक प्रकार, उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश https://goo.gl/5AMC41
- डोक्याला बाशिंग, मेहंदी लावलेल्या हाती धनुष्य, भर मंडपात नवरीकडून आधी तिरंदाजीची प्रात्यक्षिकं, मग लग्न, अहमदनगरमधील अनोख्या लग्नाची चर्चा https://goo.gl/JwY3jZ
- तंबाखूचा तोबरा भरुन कोर्टात, न्यायाधीशांकडून पोलिसाला खराब भिंती स्वच्छ करण्याची शिक्षा, अहमदनगर कोर्टातील प्रकार https://goo.gl/abmDdE
- अजय देवगण मोठ्या पडद्यावर 'चाणक्य' साकारणार, अजयची ट्विटरद्वारे माहिती, तर नीरज पांडेचं दिग्दर्शन https://goo.gl/om3N6U
- मोटो सीरिजमधील Moto E5, Moto E5 Plus लाँच, परवडणाऱ्या किमतीत भन्नाट फीचर्स, अमेझॉनवर फोनची विक्री https://goo.gl/2sR5cr
- ख्रिस्तियानो रोनाल्डोचा इटलीच्या युवेन्ट क्लबशी 847 कोटींचा करार, अख्ख्या आयपीएलचा खर्च एका खेळाडूवर https://goo.gl/KY47VR
- रशियातल्या विश्वचषकाच्या रणांगणात आज उपांत्य फेरीची दुसरी लढाई; इंग्लंड आणि क्रोएशिया संघांमधल्या विजयी संघाचं फ्रान्सला आव्हान https://goo.gl/ExGx9c
- माऊलींची पालखी आज जेजुरी तर तुकोबांची पालखी वरवंडमध्ये मुक्कामी, पंढरपूर मंदिर प्रशासनाकडून 10 लाख लाडूंच्या प्रसादाची तयारी https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement