Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 मार्च 2021 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, एम्स रुग्णालयात घेतला को-वॅक्सिनचा पहिला डोस, न घाबरता डोस घेत देश कोरोनामुक्त करण्याचं आवाहन
2. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिडिटी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचं आजपासून लसीकरण, सरकारी केंद्रावर मोफत डोस, मुंबईत 80 केंद्र सज्ज
3. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, वेगवेगळ्या मुद्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनिती
4. पूजा चव्हाण प्रकरणाचं गलिच्छ राजकारण करणारे मोहन डेलकर आत्महत्येवर गप्प का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, विरोधकांवर दुतोंडी असल्याचा हल्लाबोल
5. आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, नागपुरातल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयातले व्हीडिओ व्हायरल
6. पुण्यात नाईट कर्फ्यू वाढवला, रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचार निर्बंध कायम, अमरावतीत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, बुलडाण्यातही लॉकडाऊन वाढवला
7. भिवंडीत पुन्हा एकदा मोठं अग्नितांडव, रांजणोली गावातल्या वखारीला भीषण आग
8. मराठा आरक्षणाच्या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांची पाठ,रविशंकर प्रसाद गैरहजर, पत्रव्यवहार करुनही मंत्र्यांची बैठकीला दांडी
9. सेल्फी काढताना नाव उलटली, उजनी जलाशयात बुडून बाप लेकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश
10. सत्तांतराविरोधात म्यानमारमध्ये नागरिक रस्त्यावर, आंदोलकांवर गोळीबार, 18 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी