एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 8 सप्टेंबर 2019 | रविवार | एबीपी माझा
महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
- मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रात्रभर पावसाच्या जोरदार सरी, अनेक सखल भागांत पाणी साचलं, येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधारेचा अंदाज2. कोल्हापुरातील राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस, सर्व स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ 3. दोन दिवसांपासून गडचिरोलीत पावसाचं धूमशान, मुख्य रस्ते पाण्याखाली, 300 गावांचा संपर्क तुटला, मुंबईतही मुसळधार पाऊस 4. मुंबईतल्या मेट्रोच्या पायाभरणीसह मोदींकडून वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन, औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीचं उद्घाटन, तर महिला बचत गटांसाठी मोठ्या घोषणा 5. गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषण न करण्याचा संकल्प करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन 6. येत्या 2 ते 4 दिवसांत युतीचं जागावाटप निश्चित होणार, खुद्द उद्धव ठाकरेंची घोषणा, नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ म्हणून उल्लेख 7. विधानसभेसाठी काँग्रेस 10 तारखेला पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता, काँग्रेसनं 60 तर राष्ट्रवादीनं 70 उमेदवारांची नावं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती 8. गड-किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, राज्य सरकारच्या ऐतिहासिक पर्यटन धोरणावरून राज ठाकरेंची सरकारवर आगपाखड, 9. तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान 10. त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. ल. धारुरकर यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर, बदनामीकारक वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
क्रीडा
Advertisement