एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 4 एप्रिल 2019 | रविवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 4 एप्रिल 2019 | रविवार | एबीपी माझा
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर, युतीच्या घोषणेनंतर 9 एप्रिलला औसा येथे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी एकत्र येणार
2. बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा, तर अमित शाह प्रचारासाठी चंद्रपुरात
4. औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची पुन्हा एकदा जीभ घसरली, आपले 40 अतिरेकी मारल्याचा पुनरुच्चार, दुसऱ्या सेकंदालाच चूक सुधारली
5. राजकीय क्षितिजावर यापुढे मोदी-शाह दिसू नयेत, शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरे आक्रमक, राहुल गांधींना संधी देण्याचंही आवाहन
6. शरद पवार, राजीव सातव मैदान सोडून पळाले, नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात तर आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवरही निशाणा
7. काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या शिकवतात, दिल्लीतल्या सभेत सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल, भाजपला देशातली विविधता नापसंत नसल्याचा आरोप
8. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरविरोधात भाजपच्या नेत्याची तक्रार, टीव्ही शोतून उर्मिलानं हिंदूच्या भावना दुखावल्याचा दावा, उर्मिलानं आरोप फेटाळले
9. सुट्टीनिमित्त घरी आलेल्या जवानाची घरात घुसून दहशतवाद्यांकडून हत्या, उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील घटना, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
10. मुंबई इंडियन्सकडून सनराईझर्स हैदराबादचा 40 धावांनी धुव्वा, पदार्पणातच अल्झारी जोसेफच्या सहा विकेट्स, आयपीएलमध्ये मुंबईचा तिसरा विजय
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























