स्मार्ट बुलेटिन | 05 मार्च 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29वर, कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने गुडगावमध्ये पेटीएमचं कार्यालय बंद
2. कोरोना संशयितांच्या नमुन्यांची मुंबईतही तपासणी होणार, कस्तुरबा रुग्णालयात पाच तासांत अहवाल मिळणार, तर चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे
3. विधीमंडळाचा आजचा दिवस महिला प्रश्नांसाठी समर्पित, सभागृहात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचा ठराव येणार
4. दिल्ली हिंसाचाराप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
5. खासदार जयसिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल करा, सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश, लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप
6. देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता, राजकारण सोडून लेखक व्हा, देवेंद्र फडणवीस लिखित 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला
7. सार्वजनिक क्षेत्रातल्या 10 बँकांच्या एकत्रीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 10 बँकांच्या एकत्रीकरणातून 4 बँका अस्तित्वात येणार
8. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनींचं रॅगिंग, वसतिगृहातील मुलींना रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत उभं केलं
9. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लीलावती रुग्णालयात, नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती
10. महिला टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडसोबत, आतापर्यंत विश्वचषक गाजवलेल्या शेफाली वर्माच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष