स्मार्ट बुलेटिन | 30 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. खरेदी केलेल्या कांदा विक्रीसाठी व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुदत, केंद्र सरकारकडून किंचितसा दिलासा, लवकर लिलाव सुरु करण्याचं मुख्यमंत्र्यांचं लक्ष
2. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही ऑक्टोबरच्या अनलॉक गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, कन्टेन्मेंट झोनमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन
3. उदयनराजे भोसलेंकडून आज मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन, वेगवेगळ्या पर्यायांवर विचार होणार; याचिकाकर्ते, कायदेतज्ज्ञांना हजर राहण्याचे आदेश
4. राज्यपालनियुक्त 12 जागांवरुन महाविकास आघाडीमध्ये संभ्रम, तिन्ही पक्षांची नावांबाबत गुप्तता, उर्मिला मातोंडकरांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न
5. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 12 हजार कोटींचा घोटाळा, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप, चौकशीच्या मागणीसाठी आज राज्यपालांना भेटणार
6. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत, तीन वर्षांच्या मुलाला घरातून उचलून नेलं, हल्ल्यात मुलाचा मृत्यू, बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद
7. सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य, शासन आदेशाला शिक्षक संघटना आणि आमदार कपिल पाटील यांचा विरोध
8. फ्रान्समधील मोहम्मद पैगंबर अवमानप्रकरणाचे मुंबईतही पडसाद, भेंडीबाजारात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा निषेध
9. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीची चौकशी करा, मुंबईतील कोर्टाचे आदेश, 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे पोलिसांना निर्देश
10. चेन्नईचा कोलकातावर सहा विकेट्सनी विजय; ऋतुराज गायकवाड सामन्याचा हिरो, पराभवामुळे कोलकाताची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशाही मावळली