एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 28 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय, यूजीसीच्या गाईडलाईन्सना अनेकांचं आव्हान; निकालाकडे देशाचं लक्ष
- रियाचा भाऊ शोविकची सीबीआयकडून काल आठ तास चौकशी, तर ईडीकडून बँकेतल्या कागदपत्रांची सात तास तपासणी; तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोचं पथक मुंबईत
- राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास लोकल धावणार, मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; निर्णयाचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारच्या हातात
- जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं
- राज्यात काल दिवसभरात 14 हजार 718 नव्या कोरोना बाधितांची नोंद, 355 जणांचा मृत्यू तर 9 हजार 136 जणांना डिस्चार्ज
- जगभरात कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या24 तासात2 लाख 63 हजार 333 नव्या कोरोना बाधितांची नोंद
- कोरोना देवाची करणी, जीएसटी कलेक्श्नवर परिणाम करणारा अदृश्य घटक; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं वक्तव्य
- विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध, विठ्ठलाचं पदस्पर्श करुन दर्शन काही दिवस बंद ठेवण्याची मागणी
- महाराष्ट्र विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
- प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच गळा आवळला; पालघरच्या बोईसर परिसरातील धक्कादायक प्रकार, 24 तासांत दोन आरोपींना बेड्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement